नगर तालुका  : वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १० शेळ्या ठार, दोन जखमी

नगर तालुका : वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १० शेळ्या ठार, दोन जखमी

Published on

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा: जेऊर परिसरात २५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास वन्यप्राण्याच्या हल्ल्यात विमल अशोक बर्डे यांच्या १० शेळ्या ठार तर दोन शेळ्या जखमी झाल्या आहेत. ही घटना माळखास शिवारात गट नं ३८६/२ मध्ये घडली. विमल बर्डे यांनी सांगितले, हल्ला बिबट्याकडुन करण्यात आला असून दोन बिबटे निदर्शनास आले आहेत.

तर वनविभागाच्या वतीने हा हल्ला लांडग्यांच्या कळपाने केला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सदर घटनेचा पंचनामा वनरक्षक श्रीराम जगताप यांनी केला, तर शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कराळे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news