जामखेड : नागेश पवार मृत्यू अधिवेशनात प्रश्न चर्चेत, आमदार प्रा. शिंदे, आमदार पवार यांनी केला उपस्थित | पुढारी

जामखेड : नागेश पवार मृत्यू अधिवेशनात प्रश्न चर्चेत, आमदार प्रा. शिंदे, आमदार पवार यांनी केला उपस्थित

जामखेड : पुढारी वृतसेवा : जामखेडचा नागेश रामदास पवार हा तरुण मोलमजुरीसाठी दोन महिन्यांपूर्वी पुण्यात गेला होता. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. यावेळी त्याला रेल्वे पोलिसांनी मारहाण केली, यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, आसा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी आमदार प्रा. राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत, तर आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत आवाज उठवला.

तसेच, मृतकाच्या नातेवाईकांना न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली. जामखेडमध्ये तहसीलदार योगेश चंद्रे व पोलिसांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणी सखोल चौकशी करून पुणे रेल्वे पोलिसांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, पारधी आदिवासी महासंघाचे प्रकाश काळे, राम पवार, विशाल पवार आदी उपस्थित होते.

शहरातील आरोळे नगर भागातील तरुण नागेश पवार हा दोन महिन्यापूर्वी मोलमजुरीसाठी पुण्यात गेला होता. याच दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी त्याला पुण्यातील रेल्वे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. यावेळी तपासा दरम्यान पुणे रेल्वे पोलिसांनी त्यास मारहाण केली. यामुळे त्याचा मंगळवारी (दि.23) रात्री मुत्यू झाल्याचा आरोप नागेशच्या नातेवाईकांनी केला. याबाबत घटनेची माहिती आमदार प्रा. राम शिंदे मिळाली. त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेच उपस्थित केला. तर, आमदार रोहित पवार यांनीही विधासेभेत हा विषय घेत दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

Back to top button