अहमदनगर : संगमनेरात दोन गटांत चाकू, तलवारीने हाणामार्‍या | पुढारी

अहमदनगर : संगमनेरात दोन गटांत चाकू, तलवारीने हाणामार्‍या

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा :  उरुसामध्ये नाचताना केवळ धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गट एकमेकांना भिडले. किरकोळ भांडणात एकाने दुसर्‍यावर तलवारीने, तर दुसर्‍याने तिसर्‍यावर चाकूने वार करून तीन जणांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडल्याने शहरात दहशत पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादींवरून चार जणांविरुद्ध आर्म अ‍ॅक्टसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी सांगितले की, संगमनेर तालुक्यातील निमोण येथे (दि.18 ऑगस्ट रोजी अशापीर उरूस सुरू होता. या उरुसाकरिता फरदीन शेख त्याचा मित्र आयान शेख व इतर मित्र गेले होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास उरुसामध्ये नाचत असताना अमन शेख याचा फरदीनला धक्का लागला होता. यावेळी ‘माझ्या अंगावर येऊन मला धक्का देऊ नको’, असे अमन याने म्हटल्याचा
यास राग आला आणि त्याने फरदीन व त्याच्या मित्रास मारहाण केली. मात्र, फरदीन याने सामंजस्याची भूमिका घेत भांडण मिटविले व ते सर्व जण घरी निघून गेले.

दरम्यान, त्याच रात्री संगमनेर येथे फरदीन व त्याचा मित्र आयान याच्या मोटारसायकलवर बसून, चहा पिण्यासाठी आयानच्या घरापासून येत असताना अलकानगरमध्ये त्यांची गाडी बंद पडली. त्याचवेळी फरदीन व त्याच्या मित्र गाडी चालू करण्याचा प्रयत्न करीत असताना फरहान शेख व अमन शेख हे दोघेही फरदीन यांच्या जवळ आले अन फरहान व अमन या दोघांनी उरूसमध्ये झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी फरदीन व मित्र आयान यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फरदीन आणि आयान यांनी गाडी सोडून पळण्याचा प्रयत्न केला. फरहान याने हातातील तलवारीने फरदीनचा मित्र आयान याच्या पायावर वार केला. फरहान
व आमन या दोघांनी हॉकी स्टिक व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी फरदीन मित्राला सोडवण्यासाठी गेला असता आमन
याने फरदीनला हॉकी स्टिकने डोक्यावर, खांद्यावर, मानेवर मारहाण केली. यात फरदीनसह मित्र दोघेही गंभीर जखमी झाले.
त्या दोघा जखमींना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

याबाबत फरदीन शेख याने दवाखान्यात पोलिसांना दिलेल्या जबाबावरून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फरहान शेख, अमन शेख (रा. जम-जम कॉलनी, संगमनेर) या दोघांविरोधात आर्म अ‍ॅक्ट कायद्यानुसार विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो. ना.गायकवाड करत आहे. अमन इम्रान शेख याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, (दि.18) रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास निमोण येथे आशापीर बाबांच्या उरुसानिमित्त अमन हा सात ते आठ मित्रांबरोबर गेला होता. तेथे गर्दीत चालताना फरदीन याला आमनचा मित्र फैजान याचा धक्का लागल्याने बाचाबाची झाली होती. यानंतर अमन हा अलकानगर येथील इलेक्ट्रॉनिक डीपीसमोरून पायी घरी जात होता. आमच्याकडून धक्का लागला नव्हता, असे म्हणताच फरदीन याने चाकूने अमनच्या उजव्या हातावर वार केला, तर अल्तामश व जुनेद याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने अमन यास मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘आता तुला जिवंत सोडणार नाही,’
असे म्हणत अमन याच्या पोटास डाव्या बाजूने खुपसून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत नातेवाईकांनी अमनला उचलून खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.

याबाबत जखमी अवस्थेत अमन शेख याने दिलेल्या जबाबावरून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अल्तामश पिंजारी, जुनेद शेख, फरदीन
शेख, आयान शेख (रा. जम-जम कॉलनी, संगमनेर) यांच्या विरोधात आर्म अ‍ॅक्टसह गुन्हा दाखल झाला. तपास पो. उ. नि. निवांत जाधव करीत आहेत.

Back to top button