प्रत्येक गावात रोजगार परिसंवाद यात्रेचा कार्यक्रम राबविला जाणार | पुढारी

प्रत्येक गावात रोजगार परिसंवाद यात्रेचा कार्यक्रम राबविला जाणार

नान्नज : पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावात रोजगार हमी परिसंवाद यात्रेचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. या परिसंवाद यात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका मनरेगा समन्वयक शैलेंद्र मानतकर यांनी केले. तालुक्यातील पहिली रोजगार परिसंवाद यात्रा लोणी गावात नुकतीच संपन्न झाली. यामध्ये नागरिकांनी मोठा सहभाग नोंदविला.

तालुक्यात चार टप्प्यांत पार पडणार्‍या या परिसंवाद यात्रेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून प्रत्येक कुटुंब लखपती बनविणे, तसेच गाव समृद्ध करणे असा असल्याने या परिसंवाद यात्रेत नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवावा, असे आवाहन मनरेगा समन्वयक मानतकर यांनी केले. तालुक्यातील प्रत्येक गावात मनरेगा योजना यशस्वी व्हावी, व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा, हा प्रयत्न मनरेगा समन्वयकांचा असल्याचे मानतकर यांनी सांगितले. लोणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नेताजी बाबड यांनी परिसंवादात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अफसना अन्सार शेख, गणेश बामडाळे, माजी सरपंच सिद्धेश्वर सेंडकर, जयवंतराव परकड, रोजगार सेवक शिवाजी बामडाळे, शुभांगी बेरागी, अन्सार पठाण, बलभीम परकड, बबन शेख, दत्ता दाताळ, बाळासाहेब खेरे, विजय घुमरे, मंगल पवार, शबाना शेख, नंदाबाई सुतार, शेषबाई गायकवाड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button