श्रीरामपूरमध्ये कांद्याला 1400 रुपयांवर भाव | पुढारी

श्रीरामपूरमध्ये कांद्याला 1400 रुपयांवर भाव

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांदा लुज मार्केटमध्ये 86 साधने आवक झाली. एकूण 1498-20 क्विंटल कांदा आवक झाली. कांद्याचे बाजारभाव नंबर 1 कमीत कमी 900 ते जास्तीत जास्त 1400 रु. क्विंटल, नंबर 2 कांदा कमीत कमी 650 ते जास्तीत जास्त 850 व नंबर 3 कांदा कमीत कमी 300 ते जास्तीत जास्त 600 क्विंटल, गोल्टी कांदा कमीत कमी रु. 800 ते जास्तीत जास्त रु. 1050 बाजारभाव निघाले.

भुसार मार्केटमध्ये गहू 2 क्विंटल आवक झाली असून, 2 हजार रुपयांचे बाजारभाव निघाले. सोयाबीन 65 क्विंटल आवक झाली. कमीत कमी रु. 5 हजार 800 व जास्तीत जास्त 6 हजार व सरासरी रु. 5900 बाजारभाव निघाले. हरभरा 1 क्विंटल आवक झाली. 3 हजार 800 रुपयांचा बाजारभाव निघाले. तूरीची 1 क्विंटल आवक आली. 3 हजार 100 रुपयांचा बाजारभाव निघाला.

Back to top button