नगर : ‘मुळे’ला पूर; तीन गावांचा संपर्क तुटला

नगर : ‘मुळे’ला पूर; तीन गावांचा संपर्क तुटला
Published on
Updated on

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणातून दहा हजार क्युसेक विसर्ग सोडल्यानंतर नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान, मुळा नदी पात्रावरील तांदुळवाडी-शिलेगाव पूल पाण्याखाली गेल्याने तीन गावांचा संपर्क तुटल्याची परिस्थिती आहे. पाणलोट क्षेत्रावर कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असल्याने नदी पात्रालगतच्या ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

मुळा धरणातील पाणीसाठा 25 हजार 245 दलघफुटावर पोहोचला आहे. धरणाकडे दुपारच्या सत्रामध्ये 6 हजार 700 क्युसेक प्रवाहाने नवीन पाणी जमा होत होते. दरम्यान, मुळा धरणाचे कोतूळ सरिता मापन केंद्रापासून नवीन आवकेच्या पाण्याला धरणाच्या बॅक वाटरमध्ये जमा होण्यासाठी 40 किमीचा पल्ला पार करावा लागतो. त्यामुळे आवकेचे पाणी हे सुमारे 20 ते 24 तासांच्या कालावधीत धरणाच्या दरवाजावर आदळते. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी धरणाकडे 10 ते 12 हजार क्युसेकने पाणी धरणात जमा होत असल्याने साठा वाढत असल्याचे चित्र आहे. परिणामी मुळा पाटबंधारे विभागाने वेळीच दक्षता घेत धरणातून मंगळवारी (दि.16़) रोजी सायंकाळी 10 हजार क्युसेकने विसर्ग सोडला. धरण स्थळावरून सायरन देत लगतच्या ग्रामस्थांना पाण्याचा विसर्ग वाढविला जात असल्याचा इशारा देण्यात आला होता.

मुळा धरण स्थळी असलेल्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता शरद कांबळे, स्थापत्य अभियंता सलीम शेख, सुनील हरिश्चंद्रे, आयुब शेख, अण्णासाहेब आघाव, सोपान देवकर, हबीब शेख यांनी तत्काळ धरणाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग वाढविला. नदी पात्रामध्ये 10 हजार क्युसेकने पाणी झेपावत असल्या

नव्याने आवक घटली

14 ऑगस्ट रोजी धरणाचे 11 दरवाजे उघडल्यानंतर 2 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले होते. तीन दिवसात धरणाचा विसर्ग 10 हजार क्यूसेकने वाढविण्यात आला आहे. बुधवारी दुपारी पाणलोट क्षेत्रावरील पाऊस ओसरल्याने आवक 5 हजार 016 क्यूसेक इतकी होत होती. आवक कमी होत गेल्यास धरणाचा विसर्ग कमी केला जाईल अशी माहिती उपअभियंता कांबळे यांनी दिली. ने पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

तांदूळवाडी, कोंढवड व शिलेगाव शिवारात असलेले मुळा नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहे. संबंधित पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरत असल्याने तिन्ही गावांचा संपर्क तुटल्याचे चित्र आहे. धरणातून कमी जास्त प्रमाणात आवक होत असल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे.

वाळू उपशाने नदीपात्राला धोका वाढला

मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बारागाव नांदूर, डिग्रस, मानोरी, तांदुळवाडी, आरडगाव, शिलेगावसह नदीपात्रामध्ये वाळूतस्करांनी बस्तान मांडत बेसुमार वाळूउपसा केल्याने नदीपात्राची दिशा बदलत चालली आहे. परिणामी वाळू उपशाने नदीपात्रात तयार झालेले मोठ मोठे खड्डे व पात्राचे बदलेली दिशा पाहता नदी पात्रालगतच्या गावांना धोका वाढत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news