नगर : साडेचार लाखांचा दारुसाठा हस्तगत | पुढारी

नगर : साडेचार लाखांचा दारुसाठा हस्तगत

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील देवगाव येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना ठेवलेला 4 लाख 36 हजार रुपयांचा दारुसाठा नेवासा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. कार्ल्स बर्ग कंपनीच्या बिअरचे एकूण 158 बॉक्स पोलिसांनी येथून हस्तगत केले आहेत.

देवगाव येथील महेश बाळासाहेब दारकुंडे याच्या राहत्या घरासमोर पत्र्याचे शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीर दारुचे बॉक्स विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेले आहेत, अशी माहिती नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानंतर लगेच पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, कर्मचारी राहुल यादव, गणेश इथापे, सुमित करंजकर, बाळासाहेब खेडकर आदींनी सदर ठिकाणी छापा टाकला.

या ठिकाणी कार्ल्स बर्ग कंपनीच्या बिअरचे एकूण 158 बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये 12 बॉटल, असा एकूण 4 लाख 36 हजार 80 रुपये किंमतीच्या बिअरच्या बाटल्याचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नितीन भताने पुढील तपास करीत आहेत.

Back to top button