नगर : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद | पुढारी

नगर : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

शेवगाव, पुढारी वृत्तसेवा : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे. ‘काही व्यक्ती शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असून, ते सध्या शेवगाव- गेवराई रस्त्यालगत शहरातील पाण्याच्या टाकीजवळ टपरी आडोशाला ही टोळी बसली होती.

टोळीची माहिती पोलिस निरीक्षक विलास एस. पुजारी यांना मिळाली होती. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक बागुल, सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके, रात्रगस्तची अंमलदार रामेश्वर घुगे, संभाजी धायतडक, अशोक लिपणे, नागरगोजे, होमगार्ड झिरपे व शेकडे यांना तत्काळ शेवगाव पोलिस ठाण्यात बोलावून ही हकीकत सांगितली.

घटनास्थळी रवाना होऊन शेवगाव-गेवराई रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ पत्र्याच्या टपरीमागे पाच जण बसलेले त्यांना दिसून आले. जागीच वाहन थांबून त्यांच्याकडे या पोलिस पथकने चौकशी केली असता, चुकीची उत्तरे दिली आणि पोलिसांना पाहून पळू लागले. याचवेळी पोलिस पथकाने त्यांतील चौघांना पकडले. त्यातील एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळाला. मंगेश नामदेव मडके, संकेत संतोष जगताप, नीलेश ऊर्फ कानिफनाथ राजन ऊर्फ सजन नेमाणे (सर्व रा. चापडगाव, ता. शेवगाव) व आकाश रोहिदास तेलोरे (रा. वरखेड सांगवी, ता. शेवगाव) असे असल्याचे सांगितले.

पळून गेलेल्याचे अनिल मातंग (रा. हातगाव, ता. शेवगाव), असे त्याचे नाव आहे. यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य, लोखंडी अर्धगोलाकार पाते, फरशी कुर्‍हाड, लोखंडी गज, पिवळ्या रंगाची नायलॉन दोरी, लाल मिरची पूड, लाकडी दांडा, दोन मोटारसायकल व मोबाईल असा एकूण एक लाख 40 हजारांचा मुद्देमाल मिळून आला.

Back to top button