नगर : शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलनाचा इशारा | पुढारी

नगर : शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलनाचा इशारा

काष्टी, पुढारी वृत्तसेवा : शासकीय जागेवरील अतिक्रमण 30 दिवसांत हटवावे, अन्यथा उपोषण करू, असा इशारा मच्छिंद्र पुराणे यांनी दिला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील अधोरे वाडी येथील गट नं. 38 मध्ये आमची शेतजमीन मिळकत असून आमच्या गटाला लागून 33 फुटांची पूर्व-पश्चिम शिव आहे. उतर-दक्षिण नदी असून आमच्या गटाच्या दक्षिण बाजूला शिवेनंतर टाकळी कडेवळीतची हद्द आहे. ही शिव व त्या पलीकडील दक्षिण बाजूस घोड केनॉल पाटबंधारे विभागाची जागा असून त्या जागेवर बबन यशवंता लाढाणे व इतर काही शेतकर्‍यांनी अतिक्रमण करून जमीन वहिवाट करून विविध पिके घेत आहेत सदर जमिनीतून विनापरवाना बेकायदा बेसुमार(मुरुम) गौण खनिजाचे उत्खनन करीत आहेत. त्यापासून लाखो रुपयांची कमाई करीत आहेत.

लाढणे कुटुंबीय दहशत निर्माण करीत आहेत. त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती पोलिस सेवेत असून, पदाचा दुरुपयोग करून आमच्यावर दडपशाही करीत आहे, अशी तक्रार पुराणे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदार, पोलिस निरीक्षक व पाटबंधारे विभागाकडे केली आहे. येत्या 30 दिवसांत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही पुराणे यांनी दिला आहे.

Back to top button