जिल्ह्यात 123 हातभट्ट्यांवर छापे
नगर : जिल्ह्यात अवैधरित्या गावठी दारू विक्री करणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईची मोहीम हाती घेऊन तब्बल सात लाखांची हातभट्टीची दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. दि. 15 जुलै ते 31 जुलै या कालावधीत पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी 123 ठिकाणी छापे टाकून अवैधरित्या गावठी दारू काढणार्यांवर कारवाई केली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, दिनकर मुंढे, सोपान गोरे आदींच्या पथकाने केली.