जामखेड : हनुमान गडाचे खाडे महाराजांना मारहाण | पुढारी

जामखेड : हनुमान गडाचे खाडे महाराजांना मारहाण

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांना मारहाण झाली. याचा पाच जणांविरोधात खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील मोहरी येथे पहाटे मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली. महारांजांकडील असलेले 13 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैनी, अंगठ्या काढून घेत मारहाण करण्यात झाली. पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज 29 जुलै रोजी तालुक्यातील मोहरी येथील घुगेवस्ती येथे महादेव मंदिराचे काम पाहण्यासाठी आले होते. त्याच दिवशी मोहरी येथील बाजीराव गिते यांच्या घरामध्ये पहाटे दीड ते साडेपाच वाजता त्यांना मारहाण करण्यात आली. याबाबत खर्डा पोलिस ठाण्यात खाडे महाराज यांनी फिर्याद दाखल केली.

फिर्यादीत म्हटले की, महादेव मंदिराचे काम पाहण्यासाठी घुगेवस्ती, मोहरी येथे गेले असता, त्याठिकाणी बाजीराव गिते, भिवा गोपाळघरे, अरूण गिते, राहूल संपत गिते, रामा गिते यांनी फिर्यादी व साक्षीदारांना बाजीराव गिते याच्या घरामध्ये बोलावून राहूल गिते याने मोबाईलमधील फोटो दाखवून शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली. यावेळी 13 लाख 60 हजार रूपये किमतीचे सोन्याच्या चैनी, अंगठ्या काढून घेतल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी बुवासाहेब खाडे महाराज जखमी असल्याने त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खाडे यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा
: पाटोदा तालुक्यातील हनुमानगड (जि. बीड) येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप झाल्याने त्यांच्यावर जामखेड तालुक्यातील खर्डा पोलिस ठाण्यात आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील मोहरी येथील संबंधित महिलेने खर्डा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्याने खाडे महाराजांवर आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, बुवासाहेब जिजाबा खाडे (रा. सावरगाव घाट, हनुमान गड, ता. पाटोदा) जून ते 12 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी महिलेला सोन्याच्या दागिन्याचे, लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेच्या संमतीशिवाय यातील बुवासाहेब खाडे याने वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. त्यामुळे महिलेच्या फिर्यादीवरून हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे यांच्या विरोधात गुरुवारी (दि.4 ) रात्री खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button