आ. राम शिंदेंचा आ. रोहित पवारांना धक्का ! कर्जतमधील तिन्ही ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व | पुढारी

आ. राम शिंदेंचा आ. रोहित पवारांना धक्का ! कर्जतमधील तिन्ही ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविले असून, भाजपचे माजीमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना जोरदार धक्का दिला आहे. कोरेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना पराभवाचा धक्का देत भाजपच्या बापूसाहेब शेळके गटाने 13 पैकी 7 जागा जिंकल्या. फाळके गटाला सहा मिळाल्या. तहसील कार्यालयात शुक्रवारी (दि.5) मतमोजणी झाली. कोरेगाव ग्रामपंचायतीवर फाळके यांचे वर्चस्व होते. भाजपचे माजी सभापती बापूसाहेब शेळके यांनी व त्यांच्या समर्थकांनी फाळके गटाचा धक्कादायक पराभव केला. निकालानंतर सर्व विजयी उमेदवारांचा भाजप कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, काकासाहेब धांडे, काकासाहेब ढेरे, अनिल गदादे, पप्पू धोदाड, गणेश पालवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बजरंगवाडी ग्रामपंचायतीमध्येही राष्ट्रवादीला धक्का बसला. विद्यमान सरपंच अंगद रुपनर यांच्या गटाला अवघी एक जागा मिळाली. भाजपने पाच जागा जिंकल्या. तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. यापूर्वी तालुक्यातील कुळधरण ग्रामपंचायतीची निवडणूक भाजप व राष्ट्रवादीने सहमतीने बिनविरोध केली. मात्र, तेथेही भाजपचे सात व राष्ट्रवादीचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.एकूणच तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये भाजपने बाजी मारली आहे. हा राष्ट्रवादी काँगे्रस तसेच आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

कोरेगाव ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : ताई दादासाहेब कोळेकर, श्रीकांत निवृत्ती वाघ, शशिकला हनुमान शेळके, सुषमा विजय पाचपुते, अंजली विनोद मुरकुटे, रोहिदास विठ्ठल अडसूळ, मालन शिवाजी मुरकुटे, जयवंत शिवाजीराव फाळके, दिलीप राजाराम जाधव, जयश्री गंगासिंग परदेशी, बदामबाई भद्रीसिंग परदेशी, अनिल कुंडलिक शेळके, मुरलीधर काशिनाथ मुळीक.
बजरंगवाडी ग्रामपंचायतीमधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : संजय काळे, सीमा अंगद रुपनर, दिगंबर रूपनर, अनिता सोन्याबाप्पू बजंगे, सुदामती कांतीलाल रूपनर, बाबासाहेब काळे, विजया दादा गोयकर.

Back to top button