करंजी : सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय | पुढारी

करंजी : सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र चिचोंडी येथील श्री आनंद विद्यालय परिसरामध्ये ग्रामस्थांच्या व विद्यालयाच्या मागणीवरून लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची व्यवस्था करू, असे आश्वासन माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिले.
श्री आनंद विद्यालयमध्ये चिचोंडीसह कोल्हार, डमाळवाडी, गितेवडी, धारवाडी, डोंगरवाडी, राघूहिवरे, कडगाव, शिराळ येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात.

परंतु, बाहेरच्या काही आडदांड तरुणांमुळे या विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना अनेक वेळा मानसिक त्रास सहन करण्याची वेळ येते. मुलींच्या छेडछाडीचे प्रकार विद्यालय परिसरात घडलेे आहेत. त्यामुळे असेे प्रकार होऊ नयेत, विद्यालयात येणारे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी सुरक्षित असावेत, यासाठी विद्यालय परिसरामध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर आमदार तनपुरे यांनी या विद्यालय परिसरामध्ये तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्याची ग्वाही दिली.

यावेळी भगवान महाराज मचे, चेअरमन पोपटराव आव्हाड, संतोष गरुड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अंबादास डमाळे, भीमराज सोनवणे, आसाराम आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने शिक्षण संस्थेचे सचिव सतीश गुगळे यांनी आमदार तनपुरे यांचा सत्कार केला.

Back to top button