नगर : ‘एटीएम’धारकाची फसवणूक | पुढारी

नगर : ‘एटीएम’धारकाची फसवणूक

नगर : पुढारी वृत्तसेवा : मुदत संपल्याने जुने एटीएम कार्ड बंद पडणार असल्याचे सांगून नवीन एटीएम कार्डसाठी एक लिंक पाठवून एकाची 18 हजारांनी फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत फसवणूक झालेल्या पाथर्डी येथील व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील व्यक्तीची 17 हजार 996 रुपयांनी फसवणूक झाली आहे. एचडीएफसी बँकेतून बोलत असल्याचे सांगून, ‘तुमचे एटीएम बंद पडणार’, असल्याचे अज्ञात व्यक्तीने फोनवरून सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना एटीएम सुरू करण्यासाठी एक लिंक पाठवून आणि त्यावर माहिती भरण्याचे सांगून खात्यातून 17 हजार 996 रुपयांनी ऑनलाईन असवणूक केली. फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button