नगर : बसस्थानकासमोरील अतिक्रमणे काढली | पुढारी

नगर : बसस्थानकासमोरील अतिक्रमणे काढली

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर बसस्थानकाच्या समोरील भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे एका वयोवृद्ध महिलेला आपला जीव गमावा लागला. या घटनेची गंभीर दखल घेत संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने संगमनेर नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बसस्थानकासमोर असणारे अतिक्रमण हट विण्याची मोहीम सुमारे एक तास राबवली या परिसरात असणारे अतिक्रमांना हटल्यामुळे अखेर या परिसराने मोकळा श्वास घेतला.

संगमनेर बसस्थानकाच्या समोर नाशिक रोडवर कायमच हातगाडीवाले आणि इतर व्यवसाय वाले अतिक्रमण करीत असतात, तसेच या भागात अवैधरित्या वाहतूक करणार्‍या काळ्या पिवळ्या जीप चालक आपल्या जीप अस्ताव्यस्त लावत आहे. त्यामुळेच खर्‍या अर्थाने ओझर खुर्द येथील एका महिलेचा जीव गेला आहे. या गंभीर बाबीची दखल घेत पो. नि. मुकुंद देशमुख यांनी स्वतः रस्त्यावर उतरून संगमनेर नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या मदतीने या भागातील सर्व अतिक्रमण हटविण्यात आले.

सध्या नाशिक रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. बसस्थानका समोरील बाजूचा रस्ता अधीच खूप अरुंद आहे. त्यातच नवीन नगर रस्त्याकडे जाणार्‍या व त्या बाजूने येणार्‍या वाहनांची संख्याही खूप मोठी असल्याने बसस्थानक चौक अतिशय वर्दळीचा बनला आहे. आज सकाळच्या दुर्दैवी अपघातानंतर आम्ही या परिसरातील काही अतिक्रमणे हटविली असून रस्त्यावर उभ्या राहणार्‍या खासगी प्रवासी वाहनांना येथे थांबण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे मनुष्यबळ ही वाढविण्यात येणार असून या रस्त्यावरील अस्ताव्यस्त उभे राहणारे वाहन चालकांना सुद्धा आपण तंबी दिली असल्याचे पो. नि. मुकुंद देशमुख यांनी सांगितले.

Back to top button