नगर : ‘अमृत’वर पुन्हा महासभेत होणार चर्चा

नगर : ‘अमृत’वर पुन्हा महासभेत होणार चर्चा

नगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या अमृत अभियानअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर बचत-वाढ विवरणपत्रच्या अनुषंगाने कलम 38 व अतिरिक्त बाबीचे काम करणे, केंद्र शासनाच्या अमृत 2 अभियानअंतर्गत शासन निर्णयानुसार विविध योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून, त्यावर महासभेत चर्चा होणार आहे. याच दिवशी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी दुसरी सर्वसाधारण सभाही होणार आहे.

मनपाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात सोमवारी (दि. 8) रोजी दुपारी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सुमारे दहा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. कै.बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या अरूधंती बिश्वास (रा. बोल्हेगाव, संभाजीनगर) या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्या महिलेच्या वारसास आर्थिक मदते देणे. निविदाकार यांनी भरलेली निविदा अनामत रक्कम परत देण्यास मंजुरी देणे, शहरातील प्रभाग दहामधील रामवाडी येथील तारकपूर, शांतीपूर ते एस.टी. वर्कशॉपपर्यंत नवीन झालेल्या डीपी रस्त्याचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे नामकरण करणे, जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत प्राप्त अनुदानातून शिल्लक असलेले अनुदान खर्च करणे, 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीतून कामे करणे व प्रस्तावित कामांसाठी महासभेची मंजुरी घेणे, असे विषय आहेत.

त्याचबरोबर बुरूडगाव कचरा डेपो व ग्रामस्थांना असलेल्या समस्यांवर चर्चा करून मार्ग काढणे. महापालिकेच्या अमृत अभियानअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर बचत-वाढ विवरणपत्रच्या अनुषंगाने कलम 38 व अतिरिक्त बाबीचे काम करणे. केंद्र शासनाच्या अमृत 2 अभियानअंतर्गत शासन निर्णयनुसार विविध योजनेची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेत सोमवारी (दि. 8) रोजी दुपारी एक वाजता महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये शहरात हर घर तिरंगा उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news