नगर : ‘मालपाणी’ने भरले तिच्या पंखात बळ! | पुढारी

नगर : ‘मालपाणी’ने भरले तिच्या पंखात बळ!

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील खांडगावच्या श्रद्धा भगवान गुंजाळ या विद्यार्थिनीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उच्च माध्यमिक परीक्षेत उत्तम गुणांच्या बळावर एमआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. आपल्या आवडीचा ‘एरोस्पेस इंजिनिअरिंग’ हा विषय निवडून तिने आपल्यातील प्रगल्भताही सिद्ध केली. त्यातून विविध पारितोषिकांसह पुढील शिक्षणासाठी तिची नासामध्ये निवड झाली. मात्र, घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने उंच भरारी घेण्याच्या तिच्या स्वप्नांना खीळ बसली. याबाबत डॉ. संजय मालपाणी यांना माहिती मिळताच त्यांनी सदर विद्यार्थिनीसह तिच्या पालकांची भेट घेत तिच्या पंखात बळ भरले.

संगमनेर शहरापासून अवघ्या काही अंतरावर खांडेश्वराच्या राऊळाभोवती वसलेल्या खांडगावात भगवान गुंजाळ हे अल्पभूधारक शेतकरी आपली पत्नी रोहिणी, मुलगी श्रद्धा व लहान मुलगा साई यांच्यासह राहतात. त्यांची मुलगी श्रद्धा ही लहानपणापासून अभ्यासात हुशार असल्याने अशिक्षित असूनही तिच्या आई-वडिलांनी सतत तिला प्रोत्साहन दिले. या बळावर तिने उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत 75 टक्के गुण मिळवताना ‘जेईई’ च्या स्पर्धा परीक्षेत 93 गुण पटकावत पुण्याच्या नामांकित एमआयटी कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीवर प्रवेश मिळवला. आपल्या आवडीच्या ‘एरोस्पेस इंजिनिअरिंग’चे शिक्षण घेताना तिने अनेक पुरस्कारही प्राप्त केले.

या सर्वांच्या जोरावर अमेरिका स्थित अलाबामा प्रांतात असलेल्या नासा संस्थेत पुढील शिक्षणासाठी तिची निवड झाली. नासामध्ये निवड होणे हा खूप मोठा बहुमान असल्याने श्रद्धाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मात्र, त्याचवेळी तिला आपल्या घरच्या परिस्थितीचीही जाणीव झाली आणि ती हिरमुसली. या दरम्यान श्रद्धाची नासामध्ये निवड झाल्याची माहिती शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय मालपाणी यांना समजली. त्यांनी श्रद्धाशी संपर्क साधून तिला तिच्या आई-वडील आपल्या कार्यालयात धनादेश प्रदान केला.

Back to top button