नगर : पोलिसांच्या छाप्यात पाथर्डीमध्ये दारू जप्त | पुढारी

नगर : पोलिसांच्या छाप्यात पाथर्डीमध्ये दारू जप्त

पाथर्डी तालुका, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मढी व माणिकदौंडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने छापे टाकून बेकायदा दारूविक्री करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल करून देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

मढी गावात पाथर्डी रस्त्यावरील हॉटेलवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने छापा टाकून अवैध दारूविक्री करणार्‍या शुभम तुळशीराम भोसले (रा. पाथर्डी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. भोसले हा विदेशी दारुची चोरून विक्री करीत होता. या कारवाईत सुमारे चार हजारांच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. विदेशी दारुच्या बाटल्या विक्री करण्याकरिता जवळ बाळगतांना मिळून आले, म्हणून भोसले याच्याविरुद्ध मनोहर नामदेव शेजवळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान, खबर्‍यामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, माणिकदौंडी गावाचे शिवारात जाटदेवळे रस्त्यावर हॉटेल मित्रप्रेमच्या आडोशाला संतोष रघुनाथ सोनाळे (रा. बोरसेवाडी) हा देशी दारुची चोरून विक्री करीत आहे. त्यांनतर माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून छापा टाकत संतोष रघुनाथ गंगाधर सोनाळे (वय 30) बेकायदा दारू विक्री करीत असल्याचे लक्षात आले. सोनाळे यांच्याविरुद्ध पोलिस नाईक सुरेश चंद्रकांत माळी यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Back to top button