नगर : मोहरम मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू | पुढारी

नगर : मोहरम मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू

नगर : पुढारी वृत्तसेवा : मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात मोहरम मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. मार्गावरील सर्वच खड्डे बुजवून मार्ग व्यवस्थित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नगर शहरात मोहरम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मोहरमसाठी विविध जिल्ह्यातून नागरिक नगरमध्ये येतात. त्यामुळे मोहरम मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात गर्दी होते. रस्त्यावरील खड्डे मिरवणुकीला अडथळे ठरतात. त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात येतात. आगामी साजर्‍या होणार्‍या मोहरमसाठी नगर शहरातील मोहरम मार्गावरील खड्डे बुजविण्यास शुक्रवारपासून सुरूवात करण्यात आली.

मोहरम मार्गावरील खड्डे अगोदर उकरून पुन्हा खडी व डांबरच्या सह्याने बुजविण्यात येत आहेत. त्यामुळे रस्ता मजबूत होणार आहे. मनपाच्या निधीतून हे काम करण्यात येत आहे, असे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले.

मोहरम मिरवणूक मार्ग असा

कत्तल की रात : कोठला चौक, फलटन पोलिस चौकी, कोंड्यामामा चौक, मंगलगेट हवेली, मंगल गेट, आडतेबाजार, तेलीखुंट, कापडबाजार, मोचीगल्ली, नवा मराठा प्रेस, जुना कापड मागील बाजू, सबजेल चौक, महानगरपालिका, पंचपीर चावडी, बुरूडगल्ली, हातमपुरा, डावरेगल्ली, नालबंद खुंट, कोंड्यामामा चौक, फलटन पोलिस चौकी, कोठला.

मोहरम : कोठला फलटन पोलिस चौकी, मंगलगेट हवेली, आडते बाजार, पिंजारगल्ली पारशा खुंट, जुना कापड बाजार, देवेंद्र हॉटेल, खिस्त गल्ली, बुरूडगल्ली, जुना कापड बाजार, जुना बाजार, पंचपीर चावडी, मनपा, दोबोटीचिरा, कोर्टाची मागील बाजू, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, नीलक्रांती चौक, बालिकाश्रम रोड, सावेडी.

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणार
मोहरम मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून झाल्यानंतर लगेचच गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. पावसामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button