

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यात दहा पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडतीत तीन गण सर्वसाधारण, चार गण सर्वसाधारण महिला, तर प्रत्येकी एक गणात अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे. येथील पंचायत समिती गणांची सोडत उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार छगन वाघ, नायब तहसीलदार मयूर बेरड, सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती चेलना, भरत गाट यांच्या उपस्थितीत पार पडली.
पार्थ अतुल रासने या बारा वर्षीय शालेय विद्यार्थ्याच्या हस्ते तहसील कार्यालयात सोडत काढण्यात आली. या सोडतीत पाच गण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. वाघोली गण अनुसूचित जात प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. चापडगाव, मुंगी, भातकुडगाव हे तीन गण सर्वसाधारण झाले आहेत. यावेळी भाजपचे ताराचंद लोढे, भीमराज सागडे, राष्ट्रवादीचे काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, शरद सोनवणे, शिवसेनेचे शीतल पुरनाळे, सिद्धार्थ काटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, बहुजन आघाडीचे प्यारेलाल शेख आदी उपस्थित होते.
पंचायत समिती गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे दहिगाव ने – सर्वसाधारण महिला, एरंडगाव – सर्वसाधारण महिला, चापडगाव – सर्वसाधारण, मुंगी – सर्वसाधारण, बोधेगाव – सर्वसाधारण महिला, लाडजळगाव – सर्वसाधारण महिला, भातकुडगाव – सर्वसाधारण, वाघोली – अनुसूचित जाती, अमरापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, आखेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग.