नगर : केडगाव परिसरात जुगार अड्ड्यावर छापा | पुढारी

नगर : केडगाव परिसरात जुगार अड्ड्यावर छापा

नगर, पुढारी वृत्तसेवा : केडगाव उपनगरातील देवी रोडवर शेतात रात्रीच्या बेळी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नगर शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या पथकाने बुधवारी छापा टाकला. जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा 72 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात 9 जुगार्‍याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस नाईक हेमंत खंडागळे यांनी फिर्याद दिली आहे. रितेश भाऊसाहेब बचाटे (रा. गोविंदपुरा), सागर राजू धोत्रे (रा. वडारगल्ली, केडगाव), नीलेश बाळासाहेब टाक (रा. समता कॉलनी, विनायकनगर), विनायक श्याम कांबळे (रा. राजवाडा, केडगाव), सोमनाथ रावसाहेब गिर्‍हे (रा. शाहूनगर, केडगाव), गणेश बारकू गिरी (रा. केडगाव), अंबादास महादेव चौधरी (रा. केडगाव देवीमंदिरामागे), गणेश शंकरराव आहेर (रा. एकनाथनगर), विनोद तुकाराम मगर (रा. रभाजीनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

केडगाव उपनगरात दिगंबर पाटील यांच्या शेतामध्ये विजेच्या खांबाखाली गणेश आहेर व विनोद मगर हे दोघे लोकांना एकत्र जमवून तिरट नावाचा जुगार खेळवित, असल्याची माहिती नगर शहर पोलिस उपअधीक्षक कातकडे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदार खंडागळे, दत्तात्रय शिंदे, तनवीर शेख, सुयोग सुपेकर, महेश मगर, सागर द्वारके, जालिंदर शिंदे यांच्या पथकाला सदर ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.

Back to top button