नगर : भंडारदार्‍यात आता पर्यटकांना निर्बंध

अकोले : पर्यटकांना निर्बंध घातल्यानंतर कळसूबाई प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
अकोले : पर्यटकांना निर्बंध घातल्यानंतर कळसूबाई प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

अकोले, पुढारी वृत्तसेवा : पर्यटन क्षेत्रात कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर नियम शिथिल झाल्यामुळे भंडारदरा, हरिश्चंद्र गड, कळसूबाई शिखर परिसरात निसर्गाच्या कुशीत मनमुराद आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नगर येथून पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. परंतु, पावसामुळे या आठवड्यात पर्यटक अडकले. नदीतील कार अपघातात तीन पर्यटकांचा मुत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागाने पर्यटकासाठी नियमावली लागू केली आहे.

पावसाळी वातावरणात भंडारदरा परिसरात निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अशी गर्दी होताना दिसत आहे.
पावसाळी वातावरणात भंडारदरा परिसरात निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अशी गर्दी होताना दिसत आहे.

कळसूबाई, हरिश्चंद्र गड (वन्यजीव), अभयारण्यात महाराष्ट्रातील पर्यटनाचे आकर्षण असणारे सर्वात उंच शिखर कळसूबाई, आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाची सांदणदरी, हरिश्चंद्रगड, रतनगड, अमृतेश्वर मंदिर वेगवेगळे धबधबे, तसेच ब्रिटीशकालीन भंडारदरा धरण, घाटघर धरण, रंधा धबधबा ही पर्यटनस्थळे पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. कळसूबाई शिखर परिसरात मुसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यात पर्यटक अडकले होते.वारंघुशीजवळ कृष्णवंती नदीत कार अपघातात तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे.
सध्या पावसाळी हंगाम सुरु असल्याने पर्यटनाच्या ठिकाणी अथवा कळसूबाई, हरिश्चंद्रगड (वन्यजीव), अभयारण्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून निर्बंध लावले आहेत.

असे आहेत नियम..!

सांदण दरीसह डोंगरांवर ट्रेकिंग नोंव्हेबर 2022 पर्यत बंद, नोंदणीकृत पर्यटकांना अभयारण्यात प्रवेश, धोकादायक ठिकाणी फोटोसेशन, सेल्फीला मनाई, धबधब्यालगत, पाण्यात पोहण्यास मज्जाव, गाणी वाजविणारे, हुल्लडबाजी करणार्‍यांवर गुन्हे, वेळेप्रसंगी संचारबंदी लागू करण्याचा विचार, जंगल क्षेत्रासह गड किल्ल्यांवर रात्री मुक्कामास बंदी, 25 पेक्षा अधिक आसन क्षमतेच्या वाहनांना मनाई, पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्या जागेवर मद्य सेवन करणार्‍यांवर वन्यजीव कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.

हरिश्चंद्रगड, कळसूबाई अभयारण्य परिसरात पावसाचा जोर टिकून आहे. अभयारण्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 'रेस्क्यू टीम' सज्ज ठेवल्या आहेत. दारु पिऊन हुल्लडबाजी, नियमभंग करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. नियंत्रणापेक्षा गर्दी वाढल्यास कमल 144 लागू करण्याबाबत उपविभागीय अधिकार्‍यांच्या संमतीने कार्यवाही होईल. अवघड ठिकाणी पर्यटक अडकल्यास टोल फ्री क्र.1926 किंवा वन्यजीव विभागाशी संपर्क साधावा.

                                                                 – गणेश रणदिवे, सहाय्यक वन संरक्षक

अकोले : उत्तर नगर जिल्ह्यास वरदान ठरलेले भंडारदरा धरण सोमवारी पावसाचा जोर कायम असल्याने 82 टक्के भरले. (छाया : विलास तुपे)
अकोले : उत्तर नगर जिल्ह्यास वरदान ठरलेले भंडारदरा धरण सोमवारी पावसाचा जोर कायम असल्याने 82 टक्के भरले. (छाया : विलास तुपे)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news