नगर : दीड डझनाहून अधिक हत्यारे हस्तगत | पुढारी

नगर : दीड डझनाहून अधिक हत्यारे हस्तगत

पाथर्डी, पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव शिवारात एका घरातून सुमारे दीड डझहून अधिक चोर्‍या करणासाठी लागणारी हत्यारे ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतली असून. संशयित पसार झाले आहेत.

पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव व खर्डे गावात रविवारी चोरीच्या घटना घडल्या होत्या. दुलेचांदगाव येथील सदाशिव शंकर बांगर यांच्या घरी घरफोडी, संपत त्रिंबक बांगर दोन बोकड, तर खर्डे येथील म्हातारदेव रोडे यांची एक शेळी चोरीस गेली होती. या घटनांबद्दल काही ग्रामस्थांना कुणकुण लागली. ग्रामस्थ व पोलिसांनी माळी बाभुळगाव शिवारातील एका घरावर छापा टाकून या छापा टाकला. त्यात पोलिसांना चोरीस गेलेली शेळी, दोन बोकड, दोन दुचाक्या, चोरी करण्यासाठी लागणारी टामी, कटवणी, पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, टोकदार गज, बॅटरी, लोखंडी तार कापण्यासाठीची पक्कड, चाकू, सत्तूर, कातर, कोयता, सुरी, कानस, हातोडी, नट बोल्ट खोलण्यासाठी लागणारे पान्हे, हेक्सा ब्लेड अशी दीड डझनहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतली.

माहितीच्या आधारे रविवारी दुपारी पोलिसांनी व ग्रामस्थांनी मिळून माळी बाभुळगाव शिवारातील डांगेवाडी कडे जाणार्‍या रस्त्यावर एका घरामध्ये दोन बोकड व एक शेळी हस्तगत केली. पोलिस नाईक संदीप कानडे, ईश्वर गर्जे यांनी हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी घटनास्थळी जाऊन व परिसरात आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिस व ग्रामस्थांना पाहताच आरोपी पसार झाले.

दुलेचांदगाव येथील सदाशीव शंकर बांगर घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावून शनिवारी रात्री बाहेर ओट्यावर झोपलो होते. बांगर यांना आवाज आल्याने जाग आली. त्यावेळी कुलूप उघडलेले व दार उघडे दिसले. बाजूला राहणारे त्यांचे पुतणे अमोल बांगर यांना आवाज दिला. आवाज ऐकून चोरटा ऊसात पळून गेला. आरडा ओरडा ऐकून शेजारील संपत बांगर, सुरेश बांगर व सिद्धेश बांगर व इतर काही लोक जमले. घरातील दागिणे, साड्या असा आठ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. संपत त्रिंबक बांगर यांचे दोन दहा हजारांचे बोकड चोरीस गेले. ते छाप्यात आढळून आले.

Back to top button