नगर : व्यावसायिकास पाच लाखांना फसवले | पुढारी

नगर : व्यावसायिकास पाच लाखांना फसवले

संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर खुर्द येथील एका शेळ्या विक्री करणार्‍या व्यापार्‍याने पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या एका शेळी पालन करणार्‍या एका व्यावसायिकाकडून बोकड देण्याच्या नावाखाली वेळोवेळी पैसे घेतले. मात्र, बोकड न देता त्याची सुमारे 5 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील रहिवासी असणारा गणेश धोंडिभाऊ नाईकरे हे शेळी पालन व्यवसाय करतात. नाईकरे या व्यवसायिकांने बोकड खरेदी करण्याकरिता अशोक शिंदे यास संगमनेर खुर्द येथे येवून विश्वाससाने वेळोवळी रक्कम दिली. मात्र त्याबदल्यात शिंदे याने नाईकरे यास बोकड न देता त्यांचीच 5 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

याबाबत गणेश नाईकरे यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अशोक शिंदे (रा. संगमनेर खुर्द) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक निकिता महाले या करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.

Back to top button