

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर तहसील कार्यालयासमोर पार्किंग केलेली दुचाकी कोणीतरी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. याबाबत शनिवारी तोफखाना पोलिस ठाण्यात किरण विठ्ठल खराड (रा. भातोडी, पारगाव ता. जि. नगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.