

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : इगतपुरीसह नाशिक भागात धुव्वाधार पाऊस पडल्याने नांदूर-मध्यमेश्वर बंधार्यातून गोदावरी नदीला रविवारी (दि.10) दुपारी 12 वाजता 6 हजार 310 क्यूसेसने विसर्ग सोडण्यात आला. गेल्या महिनाभरात या बंधार्यातून 5 हजार 158 क्यूसेस पाणी गोदावरीतून वाहिले. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना गंगास्नानाची पर्वणी साधता आली.
इगतपुरीसह नाशिक भागात 9 जुलै रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढील प्रमाण ेः (कंसातील आकडे आजपर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.) दारणा 34 (371), मुकणे 233, वाकी 49 (512), भाम 146 (690), भावली 80 (1181), वालदेवी 50 (100), गंगापूर 141 (526), कळश्यपी 159 (366), गौतमी 102 (359), कडवा 34 (271), नाशिक 51 (261), घोटी 0 (21), त्र्यंबकेश्वर 94 (488), इगतपुरी 242 (1134), नांदूर- मध्यमेश्वर 19 (145), ब्राम्हणगाव 60 (130), कोपरगाव 14 (103), पढेगाव 16 (116), सोमठाणा 17 (244), कोळगाव 20 (244), सोनेवाडी 12 (138), शिर्डी 6 (122), राहाता 16(217), रांजणगाव खुर्द 9 (145), चितळी 13 (157) याप्रमाणे पाऊस पडला.
या धरणातील पाणीसाठा दशलक्ष घनफुटात ः दारणा (4307), मुकणे (3528), वाकी (56), भाम (690), भावली (842), वालदेवी (137), गंगापूर (2551), काश्यपी (253), पालखेड 193, गौतमी (605) कडवा, (894) अशी आहे.