जामखेड : गहाळ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश | पुढारी

जामखेड : गहाळ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : शहरातील नागरिकांकडून गहाळ झालेले 9 मोबाईल संच पुन्हा मिळविण्यात जामखेड पोलिसांना यश आले. काल जामखेड पोलिसांनी मोबाईलधारकांना ते परत करण्यात आले. विविध कंपन्याच्यो नऊ मोबाईल संचाची किंमत 2.5 लाखांपर्यंत आहे. मोबाईल मिळाल्याने मोबाईल धारकांनी समाधान व्यक्त केले.

मोबाईल गहाळ झाला किंवा कोठे विसरून राहिलेला मोबाईल परत तो मिळाला नाही.  असे मोबाईल सोडून देत होतो. परंतु, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गहाळ मोबाईलची रजिस्टरला नोंद केली. त्यांच्या तपासाची जबाबदारी पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस कॉन्स्टेबल आबा आवारे व कॉन्स्टेबल विजय कोळी यांना दिली.त्यानुसार मोबाईल सेल विभागाचे प्रशांत राठोड यांनी यांच्या मदतीने शोध लावण्यात यश मिळाले.

त्याबद्दल पोलिस निरीक्षक गायकवाड व त्यांच्या टीमचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात,अनिल भारती, पोलिस नाईक अविनाश ढेरे, कॉन्स्टेबल आबा आवारे, विजय कोळी, दत्तू बेलेकर, अरुण पवार,संग्राम जाधव,संदीप राऊत, सायबर विभागाचे प्रशांत राठोड, मयूर भोसले, पर्यवेक्षक प्रकाश सोनवणे उपस्थित होते.

Back to top button