नगर : ‘झेडपी’ कर्मचारी ‘गारगोटी’ दौर्‍यावर! 12 जणांना संधी

नगर : ‘झेडपी’ कर्मचारी ‘गारगोटी’ दौर्‍यावर! 12 जणांना संधी

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेत प्रशासकीय सेवेत काम करताना कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढावी, या हेतूने शासनाकडून गारगोटी येथे विशेष प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. यंदा झेडपीच्या आरोग्य, बांधकाम, शिक्षण, कृषी, लघू पाटबंधारे विभागातील 12 कर्मचार्‍यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे संयुक्त प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. या ठिकाणी दरवर्षी कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो. यावर्षी 2022-23 साठी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ, कनिष्ठ सहायक कर्मचार्‍यांना प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. अशा 12 कर्मचार्‍यांची निवड प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

या कर्मचार्‍यांच्या प्रत्येकी चार-चारच्या तुकड्या आठ-आठ दिवसांच्या टप्प्प्याने गारगोटीकडे रवाना होणार आहेत. यातील पहिले चार जण हे 4 जुलै रोजीच कोल्हापूरला पोहोचले आहेत. दरम्यान, या प्रशिक्षणात निवास, जेवनाची व्यवस्था असली, तरी सहकुटुंब या दौर्‍यावर जाता येणार नाही, अशाही सक्त सूचना केलेल्या आहेत. याशिवाय प्रशिक्षणासाठी वेळेत उपस्थित राहणेही बंधनकारक असल्याचे लेखी सूचनेवरून पुढे आलेले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news