शिर्डी : शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण | पुढारी

शिर्डी : शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण

 शिर्डी : कोपरगाव तालुक्यातील हिंगणी शिवारात राहणारे वृद्ध शेतकरी कागद मारुती चव्हाण (वय 65) व त्यांचा मुलगा लवास कागद चव्हाण या दोघांना शेतीच्या वादासह शेतात छप्पर उभारण्याच्या कारणातून तिघांनी शिवीगाळ करीत कुर्‍हाड व टामीने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

नेवासा : रस्तालूट करणारे सराईत दोघे जेरबंद

ही घटना हिंगणी शिवारात घडली. या मारहाणीत कागद मारुती चव्हाण व लवास कागद चव्हाण हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी कागद मारुती चव्हाण या वृद्ध शेतकर्‍याने कोपरगाव तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून देवगण कागद चव्हाण, बाबुलाल कागद चव्हाण, शीला नितीन भोसले, शामफला कागद चव्हाण (सर्व रा. हिंगणी, ता. कोपरगाव) यांच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर डीवायएसपी सातव, पोलिस निरीक्षक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धाकराव करीत आहेत.

Back to top button