नगर : काैतुकाने गावठी कट्टा दाखवायला गेला अन् भावजयीच्या डोक्यात घुसली गोळी! | पुढारी

नगर : काैतुकाने गावठी कट्टा दाखवायला गेला अन् भावजयीच्या डोक्यात घुसली गोळी!

कोपरगाव : पुढारीवृत्तसेवा : लपवून आणलेला गावठी कट्टा दाखवण्याच्या नादात युवकाच्या हातून ट्रिगर दबले गेले आणि गोळी त्याच्या भावजयीच्या डोक्यात शिरली. तालुक्यातील पोहेगाव येथे आज सकाळी साडेदहा वाजता शनी मंदिर राजवाडा परिसरात ही घटना घडली. या गोळीबारात सुनीता संजय भालेराव (वय 32) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर लोणी येथे उपचारर्थ नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

काही तासातच आरोपीला बेड्या

दरम्यान, आरोपी विशाल भालेराव व त्याचे दोन साथीदार घटनेनंतर पसार झाले होते, मात्र पोलिसांनी कसून शोध घेत मुख्य आरोपी विशाल भालेराव याला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

घटना घडल्यानंतर काहीवेळातच आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आली होती. शिर्डी पोलीस स्टेशनचे डीवायएसपी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक संभाजी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सानप, रमेश शेख, बाळकृष्ण वर्पे, श्री दळवी यांनी माहिती संकलित करीत त्याचा ठावठिकाणा शोधला व त्याला जेरबंद केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी करत आहे.

 पंढरपूर : विठ्ठल कारखान्यात १८ वर्षानंतर सत्तांतर, भगीरथ भालकेंना पराभवाचा मोठा धक्का

घटनेची माहिती समजताच शिर्डी पोलीस स्टेशनचे डीवाय एस पी संजय सातव, पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक संभाजी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सानप, रमेश शेख, बाळकृष्ण वर्पे ,श्री दळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आरोपी विशाल सुनील भालेराव हा महिलेचा दिर असून त्याने बाहेरून गावठी कट्टा आणत भावजय सुनिता भालेराव यांना दाखवला. हा गावठी कट्टा दाखवण्याच्या नादातच घोड्याचा खटका ओढला गेला आणि आरोपींकडून सुनिता भालेराव यांच्या डोक्यात गोळी आरपार घुसली. यावेळी त्याच्यासोबत सिद्धार्थ कदम व अमोल भालेराव हे देखील होते, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.

Gold price : सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर

कुटुंबातील साहिल नितीन भालेराव, कल्पेश सुनील, भालेराव, काजल कल्पेश भालेराव यांनी ही घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनीताला त्यांनी आधी खासगी रुग्णालयात व नंतर शिर्डी व नंतर लोणीला हलवले. आरोपीचा शोध घेण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशन कडून पथक रवाना झाले.

Video: ठाण्यात शिवसेनेला खिंडार; ६१ नगरसेवक शिंदे गटात सामील

Back to top button