नगर : 128 हातभट्ट्या उद्ध्वस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त | पुढारी

नगर : 128 हातभट्ट्या उद्ध्वस्त; लाखोंचा मुद्देमाल जप्त

नगर : पुढारी वृत्तसेवा: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील अवैध दारू अड्डे आणि हातभट्टीवाल्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवित 128 दारू अड्डे उद्ध्वस्त केले, तर 128 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 11 लाख 88 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करत काही जप्तही केला. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना अवैध दारूविरुध्द विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात हद्दीत जाऊन अवैध दारू व हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले. दारू बनविण्याचे साहित्य, कच्चे रसायन असा 11 लाख 88 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याचा नाश केला. या छापेमारीत 128 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, सोपान गोरे, अंमलदार भाऊसाहेब काळे, दत्तात्रेय हिंगडे, संदीप पवार, शंकर चौधरी, रवीकिरण सोनटक्के, मनोज गोसावी, अशोक ढाकणे, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, योगेश सातपुते, शरद बुधवंत, दत्तात्रेय गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल सोळंके, दीपक शिंदे, विश्वास बेरड, संदीप घोडके, सचिन आडबल, रोहित येमूल, रंजित जाधव यांच्या पथकाने ही छापेमारी केली.

Back to top button