नगर : हस्तीदंत तस्करांना 10 दिवस कोठडी | पुढारी

नगर : हस्तीदंत तस्करांना 10 दिवस कोठडी

नगर : पुढारी वृत्तसेवा : जेऊर टोलनाका येथून हस्तीदंत विक्रीसाठी आणलेल्या सहा जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. एमआयडीसी पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता 10 दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

व्यंकटेश दुरईस्वामी, महेश बाळासाहेब काटे, महेश भगवान मरकड, सचिन रमेश पन्हाळे, निशांत उमेश पन्हाळे, संकेश परशुराम नजन, अशी हस्तीदंत तस्करी करणार्‍या आरोपींची नावे आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिस नाईक भिमराज खर्से यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. हस्तीदंत कोठून आणले, कोणाकडून घेतले, याचा तपास बाकी आहे.

Back to top button