नगर : टाकळीभान दिंड्यांचे पंढपूरकडे प्रस्थान | पुढारी

नगर : टाकळीभान दिंड्यांचे पंढपूरकडे प्रस्थान

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथील श्री साईबाबा मंदिर व श्रीराम मंदिरातून काल विठू नामाच्या गजरात टाकळीभान ते श्री क्षेत्र पंढरपूर दोन पायी पालखी दिंड्यांचे प्रस्थान झाले. श्रीराम मंदिर व श्री साईबाबा मंदिरातून दरवर्षी जाणार्‍या दोन पालखी दिंड्यांनी काल टाकळीभान येथून प्रस्तान केले. सजविण्यात आलेल्या रथामध्ये पादूका ठेवण्यात आल्या होत्या. टाळ-मृदंगाचा गजर करत शेकडो वारकरी ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा जयघोष करत होते.

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका

श्री साईबाबा पालखी दिंडी श्री विठ्ठल मदिरात आल्यावर श्री विठ्ठल मंदिर देवस्थानच्या वतीने पुजारी विजय देवळालकर व वैशाली देवळालकर यांनी पालखी दिंडीचे स्वागत केले. ग्रामपंचायत, नानासाहेब पवार मित्रमंडळ, कान्हा खंडागळे मित्र मंडळाच्यावतीने पालखी दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. पवार मित्र मंडळाच्या वतीने वारकर्‍यांना चहा, नाश्ता देण्यात आला.

Alia Bhatt : गुड न्यूज! आलिया-रणबीर होणार आई-बाबा, फोटो केला शेअर

नानासाहेब पवार, ज्ञानदेव साळुंके, कान्हा खंडागळे, चित्रसेन रणनवरे, मधुकर कोकणे, डॉ. श्रीकांत भालेराव, लहानभाऊ नाईक, नानासाहेब लेलकर, भारत भवार, जयकर मगर, रमेश धुमाळ, शावाजीराव धुमाळ, बंडू हापसे नारायण काळे, अविनाश लोखंडे, आबासाहेब रणनवरे, अप्पासाहेब रणनवरे, राजेंद्र रणनवरे, विजय बिरदवडे, जितेंद्र मिरीकर, विलास सपकळ, गणेश जठार, बाळासाहेब कोकणे, श्रीनिवास रसाळ, सर्जेराव कोकणे, दुधाळे आदी उपस्थित होते. राधेश्याम महाराज पाडांगळे, रविंद्र महाराज गांगुर्डे, संगीता शेजूळ, संदिप महाराज जाधव, गोकुळ भालेराव यांच्या अधिपत्याखाली काल पालखी दिंड्यांचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले.

Back to top button