पिंपरी : कोरोनाचे संकट वाढले, काही दिवसांपासून संख्येत वाढ | पुढारी

पिंपरी : कोरोनाचे संकट वाढले, काही दिवसांपासून संख्येत वाढ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे रविवारी (दि. 26) दिवसभरात 227 बाधित रुग्ण आढळले. गेल्या आठवडाभरात बाधित रुग्णांचे प्रमाण चौपट वाढले आहे. त्यामुळे कोरोनाची चिंता वाढू लागली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या घटून 10 ते 15 रुग्णसंख्येपर्यंत आली होती. मात्र, काही दिवसांपासून ही रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

आठवड्यापूर्वी म्हणजे 20 तारखेला कोरोनाचे 55 बाधित रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत गेल्या 7 दिवसांमध्ये ही रुग्णसंख्या चौपट वाढली. रविवारी दिवसभरात 227 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये सध्या 23 जणांवर उपचार सुरू आहेत. तर, गृहविलगीकरणात 844 रुग्णांवर उपचार केले जात आहे.

आज दिवसभरात 105 रुग्ण बरे झाले. 467 कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. आकुर्डी येथील कै. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालयात महापालिकेने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी व्यवस्था केली आहे. सध्या येथे एक रुग्णावर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. तर, वायसीएम रुग्णालयात कोरोनाचा एक रुग्ण गंभीर आहे.

Back to top button