नगर : सीना- खारोळी नदीला महापूर; बंधारे तुडूंब | पुढारी

नगर : सीना- खारोळी नदीला महापूर; बंधारे तुडूंब

जेऊर : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रविवारी (दि.26) जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सिना व खारोळी नदीला पूर आला होता. सीना नदिच्या महापुराचे पाणी बाजारपेठेत घुसले. यामुळे व्यापार्‍यांचे हाल झाले.

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका

जेऊर, ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सर्व बंधारे तुडूंब भरले. 8 जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसात बंधारे तुडूंब भरून सीना व खारोळी नदीला महापूर गेला होता. त्यावेळी सुमारे दीड तास सुरू असलेल्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांचे बांध मोठ्या प्रमाणात फुटले, तसेच सीना नदीच्या महापुराने बाजारपेठेतील दुकानांनी पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. सद्यस्थितीत सर्व बंधारे कोरडे पडले होते. परिसरातील डोंगर हिरवेगार होण्यास सुरुवात झाली आहे.

Alia Bhatt : गुड न्यूज! आलिया-रणबीर होणार आई-बाबा, फोटो केला शेअर

जेऊर परिसरात सुरुवातीलाच झालेल्या दमदार पावसामुळे मुग, सोयाबीन, बाजरीच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. पेरणी झालेल्या पिकांसाठी आज झालेला पाऊस फायदेशीर असून, या पावसावर पिके आता खुरपणीवर येणार आहेत. परिसरातील बंधारे, नाले, तलाव भरल्याने शेतकरी वर्ग समाधानी झाला आहे. रविवारी झालेल्या पावसाने जेऊर परिसरातील सर्व ओढे, नाले, बंधारे तुडूंब भरून वाहत होते. सीना, खारोळी नदी व परिसरातील सर्व ओढे तुडूंब भरून वाहत असल्याने पिंपळगाव माळवी तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे.

बीड : धारुर तालुक्यात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या; आठवड्यातील दुसरी घटना

पुरामुळे संपर्क तुटला

ससेवाडी, चापेवाडी येथील नागरिकांचा पुरामुळे संपर्क तुटला होता. बहिरवाडी येथील वाकी तलाव, इमामपूर येथील उपळ तलाव, पालखी तलाव तसेच शेटे वस्ती, डोणी तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे.

Back to top button