

नगर : पुढारी वृत्तसेवा : दिवसा ढवळ्या घरात घुसून कपाटात ठेवलेली 4 तोळे वजनाच्या दागीन्यांची पर्स चोरुन नेल्याची घटना अरणगाव रोडवरील विद्यानगर परिसरात घडली आहे. याबाबत मंदाकीनी सायमन देठे (65, रा.विद्यानगर, अरणगाव रोड) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी देठे यांच्या राहत्या घरात बुधवारी (दि.22) सकाळी 9 ते 9.30 वाजताच्या सुमारास चोरट्यांनी बेडरुममधील कपाटात ठेवलेली दागीन्यांची पर्स चोरुन नेली. पर्समध्ये 3 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 6 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 4 ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी, 1 विवो कंपनीचा मोबाईल तसेच 5 हजार रुपयांची रोकड असा 87 हजार रुपयांचा ऐवज होता. गुरुवारी (दि.23) रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.