अकोले : पाण्यासाठी ब्राह्मणवाडा ग्रामस्थ आक्रमक | पुढारी

अकोले : पाण्यासाठी ब्राह्मणवाडा ग्रामस्थ आक्रमक

बोटा : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील पठार भागातील ब्राह्मणवाडा गावच्या ग्रामपंचायतचे थकीत सव्वा कोटी वीज बिलापोटी महावितरण कंपनीने गावचे पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन खंडित केले होते. त्यामुळे ब्राह्मणवाडा गाव आक्रमक होवून रास्ता रोको आंदोलन केले आहे.

ब्राह्मणवाडा गावाला आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली. त्यामुळे आक्रमक ग्रामस्थांनी प्रशासनास निवेदन काल (दि.23) सकाळी गावात रास्ता रोको आंदोलन करून तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. महावितरण कंपनीचे सव्वा कोटी रुपये थकीत वीजबिल जरी ग्रामपंचायतकडून येणे बाकी असले, तरी ग्रामपंचायतचे सेवा कर, घरपट्टी, ऑफिस इमारत भाडे, इलेक्ट्रिक पोल, ट्रान्सफॉर्मर जागा भाडे, पाणीपट्टी कर तसेच व्यवसाय कर असे सव्वा सहा कोटी रुपये महावितरण कंपनीकडून ग्रामपंचायतीना येणे बाकी आहे.

राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदे गटात सामील, फोटो आला समोर

त्यावर ग्रामपंचायतने न्यायालयात देखील खटला दाखल केला आहे.तो प्रश्न प्रलंबित असताना देखील महावितरण कंपनीने जाणूनबुजून गावाला त्रास देत असल्याची भावना ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी व्यक्त झाले. या आंदोलनाला परिसरातील सर्व ग्रामस्थ, तसेच महिलांची लक्षणीय उपस्थित दर्शवली होती. गावचा पाणीप्रश्न गंभीर झाला असल्याने हा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी अकोल्याचे पोलिस निरीक्षक मिथून घुगे उपस्थित होते.

आंदोलनात सरपंच संतोष भांगरे, उपसरपंच सुभाष गायकर, सदस्य रवींद्र हांडे, शिवाजी आरोटे, महिला सदस्य संगीता गायकर, रुपाली जाधव, कविता रोकडे, शालुबाई कोंडे, शीला जितेंद्र आरोटे, दीपाली गायकर, सागर गायकर, गोकूळ आरोटेंसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. ब्राह्मणवाडा गावचा पाणीप्रश्न तात्पुरता मिटला असून महावितरण कंपनीने पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन जोडणी केली आहे.

महावितरण कंपनीने गावच्या पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन खंडित केल्याने गावच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. यात शेतकर्‍यांचे दहा हजारांपेक्षा जास्त जनावरांची पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना काही दगा फटका झाला, तर यास महावितरणचे अभियंता जबाबदार राहतील.गावच्या वाडीवस्तीवर स्टेट लाईट नसताना महावितरणने स्टेट लाईटचे बिल ग्रामपंचायतला काढून आपला भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. महावितरण कंपनीकडून ग्रामपंचायतची थकीत कर वसुलीबाबत न्यायालयीन लढाई सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया उपसरपंच सुभाष गायकर यांनी दिली.

Back to top button