नगर : राजुरी शिवारातील खून प्रकरणी एक जेरबंद | पुढारी

नगर : राजुरी शिवारातील खून प्रकरणी एक जेरबंद

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील तरुण शेतकरी बाळकृष्ण माधव घोरपडे या 43 वर्षीय इसमाचा संशयावरून खून करून राजुरी शिवारातील विहिरीत मृतदेह टाकण्यात आला होता. याप्रकरणातील आरोपी गंगा पारखे याच्या पोलिसांनी तब्बल अडिच वर्षांनंतर मुसक्या आवळल्या.

राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदे गटात सामील, फोटो आला समोर

दरम्यान, याप्रकरणी दुसरा आरोपी विलास हरिचंद्र निर्मळ दीड महिन्यापूर्वी पाण्यात पडून मयत झाल्याची माहिती पो. नि. समाधान पाटील यांनी दिली. मयत बाळकृष्ण माधव घोरपडे आपल्या पत्नीस मारहाण करीत असे. ही माहिती विलास हरिचंद्र निर्मळ यास समजली. त्याने बाळकृष्ण याचा काटा काढायचे ठरविले. (दि. 3 डिसेंबर 2019) रोजी दुपारी बाळकृष्ण यास चोरी गेलेली दुचाकी मिळाली, असे खोटे सांगत बाभळेश्वर येथे एका हॉटेलवर बोलावले.

राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदे गटात सामील, फोटो आला समोर

या ठिकाणी दारू पिल्यानंतर बाळकृष्ण यास मद्यधुंद अवस्थेत विलास निर्मळ व गंगा पारखे (रा. निर्मळ पिंपरी, ता. राहाता) यांनी दुचाकीवरून राजुरी शिवारात गोल्हारवाडी रोडच्या लगत रावसाहेब दादा गोरे (रा. राजुरी, ता. राहाता) यांच्या विहिरीत बाळकृष्णला ढकलून दोघे तेथून पसार झाले होते.

Back to top button