विसापूर : विकासकामे दर्जेदार करून घ्यावीत: राहुल जगताप
विसापूर : तुम्हाला पाहिजे तेवढे बंधारे व विविध विकासकामे मंजूर करून देईल. ही कामे दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी सर्व लाभधारक शेतकर्यांची आहे. ती त्यांनी स्वतः लक्ष देऊन करून घ्यावीत, असे प्रतिपादन माजी आमदार राहुल जगताप यांनी केले.
श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे हंगा नदीवर 1 कोटी 16 लाख रुपये खर्चाच्या बंधार्यांच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच जगताप व पिंपळगाव पिसा येथील ज्येेष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विश्वासराव लंके, नारायणराव शिंदे, एकनाथराव खामकर, प्रमोद जगताप, बबनराव शिंदे, संभाजी महाराज दरोडे, माउली हिरवे, प्रतापराव जगताप, सूर्यजित पवार, अनिकेत जगताप, सचिन भोसले, शिवाजी शिंदे, वसंत शिंदे, सुभाष पंदरकर, नितीन शिंदे,अनिल भोसले, प्रकाश गलबले व लाभधारक शेतकरी उपस्थित होतेे.
जगताप म्हणाले, आमदार असताना मी जलयुक्त शिवार व जलसंधारण, तसेच नदी ओढ्या नाल्यावर केटीवेअर जल साठवणूक बंधार्याच्या कामांना नेहमीच प्राधान्य दिले. आताही महाविकास आघाडीचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे जलसंधारण व बंधार्याचे कामे मंजूर करून आणले आहेत. त्यांच्या माध्यमातून तालुक्यात व मतदारसंघात आणखी कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न आहे. प्रास्ताविक प्राचार्य संपतराव पवार यांनी केले. सूत्रसंचालन मच्छिंद्र पंधरकर यांनी केले. आभार उमेश जगताप यांनी मानले.

