नगर : ट्रक लूटप्रकरणी चार जणांना अटक | पुढारी

नगर : ट्रक लूटप्रकरणी चार जणांना अटक

सोनई : औरंगाबाद – नगर महामार्गावरील 10 जून रोजी रात्री जालन्याहून पुण्याकडे जाणार्‍या 13 टन लोखंडी सळ्यांचा ट्रक लुटला होता. यातील आरोपींना सोनई पोलिस पथकाने शिताफीने अटक केली.

जालन्याहून पुण्याकडे जाताना ट्रक (एमएच 12 केपी 3295) घोडेगाव शहरात दोन मोटरसायकलवरून ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून ट्रकमधील पाच लाख 71 हजार रुपयांच्या लोखंडी सळ्या व मोबाईल चोरून भोजपुरी (ता.पाथर्डी) शिवारात सोडून गेले होते. याबाबत निसार गुलाब शेख यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

यानंतर सोनई पोलिसांनी मोठ्या शिताफीने सुजित राजेंद्र चौधर (वय 22, रा.निपाणी जळगाव, ता.पाथर्डी), संकेत बद्रीनाथ बडे (वय 20, मुळ रा. जेऊर हायबती, ता. नेवासा हली रा. आगासखांड, ता. पाथर्डी), रोहण संजय चव्हाण (वय 21, रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी), दतात्रय गोरक्ष साळुंके (वय 33, रा. निवडुंगे, ता. पाथर्डी) यांना व त्यांचे अन्या दोन ते तीन साथीदारांनी मिळून हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली.

यावरून त्यांना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्यासह सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आणखी दोन गुन्ह्याचीही कबुली दिली. चोरलेला मुद्देमाल शंकर आसाराम घोडके यास विकले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्याकडून चार लाख 80 हजार 200 रुपये किमतीचा हस्तगत केला.

Back to top button