राहुरीत कांद्याच्या दरात मोठी घसरण | पुढारी

राहुरीत कांद्याच्या दरात मोठी घसरण

राहुरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण होत आहे. काही दिवसांपूर्वी दोन हजाराचा आकडा गाठलेल्या कांद्याला रविवारी झालेल्या बाजार समितीच्या लिलावात दीड हजाराची सर्वोच्च बोली लागली. बाजार समितीमध्ये 11 हजार 871 कांदा गोण्यांची आवक झाली.

लिलावावेळी प्रथम दर्जाच्या कांद्याला 1001 ते 1 हजार 500 रूपयांपर्यंत लिलाव पुकारण्यात आला. द्वितीय दर्जाच्या कांद्याला 501 ते 1 हजारापर्यंत दर मिळाला. तृतीय दर्जाच्या कांद्याला 100 ते 500 रूपये असा दर लाभला. गोल्टी कांद्याला 400 ते 1 हजार 100 रूपयांपर्यंत दर लाभला.

Back to top button