नगर : आला पावसाळा..जीव सांभाळा..!

नगर : आला पावसाळा..जीव सांभाळा..!
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा: पावसाळ्यात वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किटआदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावध रहावे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळाव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

विजांचा कडकडाट होत असेल, तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ती मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी आणि गरजेनुसार त्याची तपासणी करावी. जमिनीवर तुटून पडलेल्या वीजतारांना स्पर्श करू नये. लोंबकळणार्‍या वीज तारांपासून सावध राहावे, याबाबत तातडीने वीज कंपनीला माहिती द्यावी.

पावसापासून बचाव करताना आजूबाजूला जिवंत विद्युत तारा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करून घ्यावी. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीजतारांपासून दूर ठेवावे. विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी. विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नयेत. विद्युत वाहिनीच्या खाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नये, खांब किंवा तणाव ताराला जनावरे बांधू नयेत.

शेतातील कुंपणात विद्युत प्रवाह सोडू नये, विजेचा अनधिकृत वापर टाळावा, विद्युत मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व जागा बदलावी. कोळी, कीटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर, तसेच स्वीच बोर्डच्या आश्रयाला येतात. त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.

जुनी वायरिंग बदलावी
वायरिंग जुने झाले असल्यास ते बदलून घ्यावे, टी. व्ही. नेहमी बोर्डवरील स्वीच बंद करून बंद करावा. आकाशात वीज चमकत असल्यास स्वीच बंद करून प्लगपीन देखील काढून ठेवावी, म्हणजे नुकसान टळेल, असे आवाहन महावितरणने केले आहे.

विद्युत उपकरणांना हात लावू नये
विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल, तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये. वीजपुरवठा खंडित झाल्यास 15 ते 20 मिनिटे थांबूनच महावितरणला संपर्क करावा. मेनस्विचमध्ये फ्यूज वायरच असावी. घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news