महिलांचा आर्थिक स्तर उंचावणार, आ.नीलेश लंके | पुढारी

महिलांचा आर्थिक स्तर उंचावणार, आ.नीलेश लंके

 

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : बचत गटांच्या माध्यमातून महिलेला आर्थिक सक्षम करण्यासाठी शासन अनेक उपक्रम राबविते. महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून स्वयं रोजगार उपलब्ध केला जातो, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
चैतन्य संस्था प्रेरित स्त्रीशक्ती महिला स्वयंसिद्ध व राजमाता जिजाऊ संघाच्या संयुक्त विद्यमाने महिलांनी केलेल्या वस्तूंचे व्यावसायिक प्रदर्शन पार पडले. त्याचे उद्घाटन आमदार लंके, नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, चैतन्य संस्थेच्या विश्वस्त सुरेखा क्षेत्रीय यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आ. लंके बोलत होते.

आमदार लंके यांनी विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी नगरसेवक अशोक चेडे, सुभाष शिंदे, विजय भास्कर औटी, डॉ. सचिन औटी, भूषण शेलार, योगेश मते, डॉ. कावरे, श्रीकांत चौरे, बाळासाहेब नगरे, नितीन अडसूळ, सरपंच बंडू साबळे, भाऊ साठे, संस्थेच्या प्रमुख कौशल्या थिगळे, प्रजाताई पाईकराव, अनंता मस्करे, ज्योती पवार, उज्ज्वला मंदिलकर, संघ व्यवस्थापक अश्विनी गवळी, सुनिता पाडळे, वैजंयता हरेल, अलका कदम, शैला भामरे, शोभा ढूस, जयश्री शत्रे, प्रतिभा अनामिक आदी उपस्थित होते.

 

Back to top button