श्रीरामपुरात कांदा पुन्हा पंधराशे : भाव घसरले | पुढारी

श्रीरामपुरात कांदा पुन्हा पंधराशे : भाव घसरले

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : येथील कांदा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची शुक्रवारी 12,190 गोण्यातून एकूण 6425-60 क्विंटल आवक झाली. कांद्याचे बाजारभाव नंबर 1 कांदा कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 1500 रु. क्विंटल, नंबर 2 कांदा कमीत कमी 700 ते जास्तीत जास्त 950, नंबर 3 कांदा कमीत कमी 300 ते जास्तीत जास्त 650 क्विंटल तर गोल्टी कांदा कमीत कमी रु. 600 ते जास्तीत जास्त रु. 950 बाजारभाव निघाले. हे बाजारभाव स्थिर आहेत.

शेतकर्‍यांनी कांदा मार्केटमध्येच विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी केले आहे.
भुसार मार्केटमध्ये गव्हाची 20 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 1900 रुपये, जास्तीत जास्त रु. 2200 तर सरासरी रु. 2075 भाव निघाले. हरबरा 40 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 3800 रुपये, जास्तीत जास्त रु. 4200 तर सरासरी रु. 4000 भाव निघाले. सोयाबीनची 30 क्विंटल आवक झाली. कमीत- कमी 5500 रुपये, जास्तीत जास्त रु. 6300 तर सरासरी रु. 6000 भाव निघाले. मकाची 7 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 1850 रुपये, जास्तीत जास्त रु. 2200 तर सरासरी रु. 2000 भाव निघाले. बाजरीची 2 क्विंटल आवक झाली. रु. 1450 भाव निघाले. बटाट्याची 247 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 15 रु. किलो, जास्तीत जास्त 20 रु. किलो व सरासरी 17 रु. किलो दर निघाले.

Back to top button