कासार पिंपळगाव परिसरात पाऊस

कासार पिंपळगाव परिसरात पाऊस

पागोरी पिंपळगाव : पुढारी वृत्तसेवा:  पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, चितळी, पाडळी, हत्रााळ परिसरात मेघ गर्जनेसह पाऊसाच्या सरी बरसल्या. पहिलाच पाऊस असल्याने शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला.

शेतातील संत्रा, डाळिंब, चिंच या फळबागांना, तसेच ऊस पिकासाठी पाऊसाची गरज होती. तरुणांनी पहिल्या पाऊसात रस्त्यावर भिजण्याचा आनंद लुटला. वार्‍याचा वेग कमी असल्याने पडझड झाली नाही. काही शेतकर्‍यांनी शेतात कपाशी लागवड केली आहे. या पिकासाठी पाऊसाची गरज होती. पाऊस आल्याने वीज गायब झाली होती. काही शेतकर्‍यांची भुईमूग काढणी चालू असून, यामध्ये पाणी साचले आहे. पाऊसाने शेतातील ऊस पिकाच्या सर्‍यात पाणी साचलेे. आंबाच्या झाडाच्या कैर्‍या पडल्या असून काही प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news