

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा: पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटत धोकादायक वळणावर एका ट्रकचा अपघात झाला. या अपघातानंतर चालकाने भीतीने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. योगेश तुकाराम कव्हळे (वय 22, रा. कारखेले बुद्रूक), असे त्या चालकाचे नाव आहे.
अपघात झाल्या त्या ठिकाणी जवळच असलेल्या बाभळीच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरुवार (दि. 9) (एम.एस. 09 बी. सी. 3982) दहा चाकी ट्रक पुणे जिल्ह्यातील यवतवरून माणिकदौंडीच्या घाटातून पाथर्डीकडे जाताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून धोकादायक वळणावर ट्रक उलटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या 20 ते 25 फूट खोल खड्ड्यात पडला.
गुरुवारी पहाटे एका झाडाला कुणतरी व्यक्ती लटकलेली असल्याचे निदर्शनात आले. बाजूला अपघातग्रस्त ट्रक पडला असल्याची माहिती पोलिस नाईक नीलेश म्हस्के, पोलिस कर्मचारी अतुल शेळके यांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी धाव घेतली.