कोपरगावात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके | पुढारी

कोपरगावात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्यात येतील. एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तका पासून वंचित राहणार नाही, याची दक्षता पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे, अशी माहिती कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी दिली.

तालुक्यात इयत्ता 1 ली ते 8 वीपर्यंतच्या जिल्हा परिषद, नगरपालिका व खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक अशा 223 शाळा आहेत. इयत्ता व विषयनिहाय तालुक्याची 1 लाख 73 हजार 442 पाठ्यपुस्तकांची मागणी होती. त्यानुसार 21 मे 2022 रोजी 93% व 3 जून 2022 रोजी 7% पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. लगेचच तालुका स्तरांवरून 7 जून 2022 अखेर 100 टक्के पाठ्यपुस्तके शाळास्तरांपर्यंत वाटप करण्यात आली आहेत.

13 जून 2022 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहाने सुरुवात होत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, समिती सदस्य , लोकप्रतिनिधी व पालकांच्या उपस्थितीत या पाठ्य पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थी, पालकात समाधान आहे.

 

Back to top button