

जामखेड : पुढारी वृतसेवा
किरकोळ फळविक्रेत्यांना जागा मिळावी, यासाठी अॅड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. किरकोळ फळविक्रेते शहरातील रहिवासी असून गेली अनेक वर्षापासून फळे विकून स्वतःची व कुटुंबाची उपजीविका करीत आहेत. नगरपरिषद हद्दीतील जागेवर फळांचा गाडा लावून शासकीय नियमाप्रमाणे कर आदा करून फळ विक्री करीत आहेत. परंतु आता त्या जागेवरती नगरपरिषद शॉपिंग सेंटरचे बांधकाम करणार आहे.
त्या फळविक्रेत्यांना त्या जागेवरून तुमचे दुकान काढा, असे सांगण्यात आले आहे. परंतु त्याना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्या फळविक्रेत्यांना पर्यायी जागा दिल्यास फळ विक्रेते त्या जागेवर जाण्यास तयार आहे. आपणच ती जागा दाखवून द्यावे. त्या ठिकाणी सगळे फळाचे गाडी लावून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतील.
अशी भूमिका त्यांनी मांडली. सुरेश जाधव, अजिनाथ शिंदे , द्वारकाताई पवार, जमीर बागवान, आय्यास बागवान, सोहेल बागवान, फिरोज बागवान, सुनील शिंदे, हुसेन बागवान, असलम बागवान, याकूब बागवान, वजीर बागवान, अझहर बागवान, वसीम बागवान, सचिन साळवे, अनिस बागवान, इरफान बागवान, समीर बागवान, सुरेश पवार, सचिन पवार, गौतम भाकरे व सर्व फळविक्रेते उपस्थित होते.