अखेर, गणवेशाची रक्कम शाळांकडे वर्ग! बँकेने दिली माहिती; आता पुढे शाळांची जबाबदारी | पुढारी

अखेर, गणवेशाची रक्कम शाळांकडे वर्ग! बँकेने दिली माहिती; आता पुढे शाळांची जबाबदारी

नगर : पुढारी वृत्तसेवा

गणवेश खरेदीसाठी निधी वर्ग करण्याची प्रक्रिया आज पूर्ण केली आहे. याबाबत तसे जिल्हा परिषदेला कळविले असून, आता पुढील जबाबदारी केंद्र, शाळांची आहे, अशी माहिती महाराष्ट्र बँकेचे अधिकारी अभिजीत फळे यांनी दिली. शासनाने शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना गणवेश वाटप करण्याच्या सूचना केल्या होत्या.

जिल्ह्यासाठी 9 कोटींचा निधीही दिला होता. मात्र, ‘पीएफएमएस’ प्रणाली आणि बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे गणवेश खरेदीचा निधी वेळेत शाळांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवशीचे हे गणवेश वाटप चिमुरड्यांसाठी मृगजळ ठरणार दिसले. याबाबत ‘पुढारी’ने लक्ष वेधल्यानंतर काल महाराष्ट्र बँकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपली प्रक्रिया पूर्ण करत संबंधित निधी शाळांना वापरता यावा, यासाठी तो संबंधित बँक खात्यावर वर्ग केला आहे.

याबाबत जिल्हा परिषदेला बँकेकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे गणवेश खरेदीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शाळांनी गणवेश खरेदीचे धनादेश बँकेत दिल्यानंतर आता देयके मंजूरीस अडचणी येणार नाहीत, असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button