नेवासा: खरवंडी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

नेवासा: खरवंडी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

नेवासा : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील राजकीज दृष्टया महत्त्वाच्या खरवंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नं.1 ची पंचवार्षिक निवडणूक ज्येष्ठ नेते व मुळा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष जबाजी फाटके यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली.

बिनविरोध निवड झालेले संचालक असे ः तुकाराम हंडे, विकास नेब, अप्पासाहेब कुर्‍हे, उमाकांत भोगे, धर्यशील सुरवसे, बाळासाहेब कुर्‍हे, दतात्रय कुर्‍हे, झुंबरबाई कुर्‍हे, सिंधूबाई मंडलिक, मनीषा कुर्‍हे, अलका वाघ, श्रीकांत राऊत, इमाम शेख.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माजी अध्यक्ष सोपान गुरुजी कुर्‍हे, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष संभाजी कुर्‍हे, प्रकाश उंदरे, सुनील भोगे, आबासाहेब फाटके, गोरख कुर्‍हे, विजय सुरवसे, विजूदादा कुर्‍हे, जयवंत लिपाणे, अशोक कुर्‍हे, केशव शिंदे, भाऊसाहेब कुर्‍हे, मेजर अरुण फाटके यांचे सहकार्य केले. या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून डी. टी महाजन व सचिव संदीप आदमने यांनी काम पाहिले. बिनविरोध संचालकांचे माजी खासदार यशवंतराव गडाख, मंत्री शंकरराव गडाख,जि. प. चे माजी सदस्य सुनीलराव गडाख, उदयन गडाख आदींनी अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news